‘गिधाडांची मेजवानी’ हे पुस्तक सामान्य नागरिकांना ‘खऱ्या भारता’ची ओळख करून देणारा आराखडा आहे. मला ठाऊक असलेल्या भारताच्या वास्तवाची ही एक प्रामाणिक नोंद आहे

आपल्या लोकशाहीच्या हृदयावर अनैतिकतेने मोठा हल्ला केला आहे, भारतीय संस्थांची अवस्था मोडकळीस आली आहे. हे सर्व भ्रष्ट आणि अनैतिक घटक एकत्र येऊन भारतातील बहुसंख्य नागरिकांना लाचार करू पाहत आहेत. या लाचार जनतेला आत्महत्या करायला भाग पाडले जात आहे. अशा मृत्यूंबद्दल वर्तमानपत्रांत येणाऱ्या एकसुरी बातम्या आणि भारतातील उच्चभ्रू लोकांची वाढती असंवेदनशीलता यामुळे मला या पुस्तकासाठी शोधपत्रकारिता करावीशी वाटली.......